Small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.
Small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.
Patient Experience
Small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country, in which roasted parts of sentences fly into your mouth.
जिल्यातील पहिले अद्यावत सुसज्ज आयुर्वेदालय
डॉ. रविंद्र लक्ष्मणराव नरवडे हे २००१ मध्ये सीएसएमएसएसए औरंगाबाद येथून आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त करून पंचकर्माचे विशेष प्रशिक्षण घेऊन मणका विकारामध्ये विशेष संशोधन केले आहे. इ.स. २००२ मध्ये पटवर्धन चौक येथे छोट्याश्या जागेत आयुर्वेदीय सेवेस प्रारंभ करुन २००९ मध्ये स्वतःच्या १००० स्क्वे. फु. स्वतंत्र पंचकर्म कक्ष असलेल्या जागेत भव्य रुग्णालय सुरु केले. रुग्णांच्या आशिर्वादामुळे २०१८ मध्ये विद्या कॉलनी, कल्याण रोड येथे १० बेडेड आयुर्वेदीय रुग्णालय शाखा नं. २ चा भव्य प्रारंभ केला. या शाखेमध्ये विशेष कक्षाची सुविधा असून, स्त्री व पुरुष स्वतंत्र पंचकर्म कक्ष आहेत. तसेच अनुभवी व प्रशिक्षित थेरेपीस्ट, स्वच्छ शुध्द पिण्याचे पाणी, उच्चप्रतीचे स्वयंनिर्मित औषधी असे अनेक सोयी उपलब्ध आहेत.
डॉ. स्वाती रविंद्र नरवडे हे २००१ मध्ये गुणे आयुर्वेद कॉलेज अहमदनगर येथून बी. ए. एम. एस. आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त करून स्त्रीरोग व सौंदर्य उपचार याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. इ.स. २००५ मध्ये आयुर्वेदीय सेवेस प्रारंभ करुन अनेक स्त्रीयांना आजार मुक्त केले आहे. वंध्यत्व, मासिक पाळीचे विकार, सौंदर्योपचार, त्वचेचे विकार, गर्भाशयातील गाठी, स्तनातील गाठी अशा अनेक आजारावर उपचार करून आनंदी केले. स्थौल्य, आरोग्य विषयक गर्भसंस्कार इत्यादीवर कार्यशाळेव्दारे स्त्रीयांना मार्गदर्शन केले आहे. मणक्यांच्या रुग्णांना पंचकर्मानंतर योग्य योगासनांची प्रात्यक्षिकासह माहिती व मार्गदर्शन दिले. यामुळे आजाराची पुनरावृत्ती टाळण्यास मदत होते.
स्वेदन
स्वेदन हे एक पूर्वकर्म आहे. यामध्ये सर्वांगास औषधी काढयाची वाफ दिली जाते. त्वचेला आलेले रुक्षत्व, अवघडलेले स्नायु शिरा इ. या वाफेने मोकळे होऊन रक्तपुरवठा सुधारतो आणि अस्थिंना बळकटी येते.
नासा ही शिरसो व्दार
नासा अर्थात नाक हे शरीराचे प्रवेश व्दार आहे. वेगवेगळी औषधी द्रव्ये अथवा तेल नासामार्गाने शरीरात देणे ही नस्य पंचकर्म या कर्माची तात्वीक बैठक असल्यामुळे केवळ नस्याने उर्ध्वभागातील सर्व आजार बरे होतात. तसेच कान, नाक, वाणी, डोळे अशा सर्व इंद्रियांना बलप्राप्ती होते.श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, अॅलर्जी, नाक चोंदणे, शिंका येणे, जुनाट सर्दी, मणक्याचे विकार (मानेचे), डोके दुखणे, मायग्रेन, अर्धे डोके दुखणे, सतत उचकी लागणे, केसांचे आजार, केस पांढरे होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे,
बस्ती
बस्ती पंचकर्माला आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा समजली जाते. असे हे बस्ती पंचकर्म दोषांचे शोधन करते, शमन करते, कृशाला बलवान व स्थूलाला कृश बनवते, दृष्टी व वर्ण सुधारते, बल, आयुष्य, आरोग्य यांची वृध्दी होऊन तारुण्य टिकवते. म्हणून तर आचार्य या बस्ती पंचकर्माला संपूर्ण चिकित्सा म्हणतात.या पंचकर्मात औषधी काढे, तेल किंवा इतर द्रव्ये गुद्व्दारावाटे शरीरात प्रविष्ट करुन संपूर्ण आजारांचा नाश करणे.
स्नेहन
स्नेहन हे एक पंचकर्मातील महत्वाचा उपचार (पुर्वकर्म) असून यात शरीराला विविध प्रकारचे तेल, दूध इ. लावुन मालिश करणे म्हणजे स्नेहन होय.रोजची धावपळ, प्रवासामुळे सांध्यांमधील वात वाढतो व वेदना होतात. यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने वात नाशक तेलांनी विविध स्नायु, सांधे, अस्थिंची मालिश करून वात कमी केला जातो यामुळे रुग्णाला आराम मिळतो.
शिरोधारा
हे एक पंचकर्म आहे. यात डोक्यावर (शिर) औषधी तेलाची धार सोडली जाते. आजच्या कॉम्प्युटर युगात वाढलेली धावपळ, कामाचा बोजा यामुळे टेन्शन, स्मृतीनाश, निद्रानाश याचा दुष्परिणाम सांध्यांवर होतो. मान, कंबरेच्या वेदना अशा आजारांवर शिरोधारा हे पंचकर्म विशेष फलदायी आहे.
विरेचन
विरेचन पंचकर्म हे प्रामुख्याने पित्त दोषाची चिकित्सा आहे. आयुर्वेदानुसार विरेचन पंचकर्म म्हणजे दोषांना प्रामुख्याने विकृत पित्त) अधोमार्गाने म्हणजेच गुदव्दारावाटे बाहेर काढणे होय.पित्ताचे स्थान आमाशय असल्याने, विरेचन पंचकर्माने कफदोष कमी करण्यास मदत होते. तसेच वाताची चिकित्सा देखील मुदुविरेचन सांगितली आहे.विकृत पित्तामुळे होणारे कुष्ठ, विसर्प, शिराशूल, नेत्रदाह, श्वास, कावीळ, पक्षाघात, शोथ, वंध्यत्व, सर्वांग दाह, पोटात गॅस होणे, मुत्रमार्गातील व्याधी, नागीण इत्यादी आजारांवर विरेचन पंचकर्म उपयुक्त आहे.
वमन
कफाचे प्रमुख मूल स्थान आमाशय आहे. त्यामुळे मुळातून कफाचे उच्चाटन किंवा नियमन केल्यास शरीरातील सर्वच कफाचे नियमन होते.आयुर्वेदातील वमन पंचकर्म म्हणजे दोषांना (प्रामुख्याने विकृत कफ पित्त) उर्ध्वमार्गाने म्हणजेच मुखाव्दारे (तोंडातून बाहेर काढणे.विकृत कफामुळे होणारे कास, दमा, अपचन, आम्लपित्त, भूक न लागणे, स्तन्यदोष, सर्व प्रकारचे त्वचा विकार, कोड, सोरायसीस, विसर्प, डायबिटीस, मेदरोग, उन्माद, अपस्मार, टॉन्सील, ग्रंथी, हृदोग, अॅलर्जी, अंगावर गांधी येणे (शीतपित्त) अशा प्रकारच्या व्याधीवर विरेचन पंचकर्म उपयोगी आहे.
उत्तरवस्ती
बस्ती पेक्षाही श्रेष्ठ असे हे उत्तरबस्ती पंचकर्म आहे.विशिष्ट प्रकारची औषधी स्त्री व पुरुष यांच्या मूत्रमार्गाने मूत्राशयात आणि योनीमार्गाने गर्भाशयात प्रवीष्ट करणे म्हणजे उत्तरबस्ती पंचकर्म होय.वंधत्व, नेहमी होणारा गर्भपात, फॅलोपीयन ट्युब ब्लॉक असणे, गर्भाशयात गाठी होणे, योनीशूल, योनीव्यापद, रजः प्रवृत्ती तसेच मुत्रमार्गाचे व्याधी, शुक्र दोष, मूत्रावरोध, मूत्रकृच्छ, मूत्राश्मरी, अशा स्त्री व पुरुषांमध्ये आढळणाऱ्या आजारांवर उत्तरबस्ती हे पंचकर्म अतिशय उपयुक्त आहे.
